गुजरातमध्ये गरबा कार्यक्रमात दगडफेकीनंतर मारामारी

0

 

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क:

गुजरातमधील (Gujrat) खेडा जिल्ह्यात (Kheda District) गरबा (Garba) स्थळावर जमावाने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले. पोलिसांनी (Police) मंगळवारी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी रात्री उंडेला गावातील एका मंदिराच्या परिसरात गरबा करत असलेल्या एका गटावर सुमारे 150 लोकांच्या जमावाने दगडफेक केली.

पोलीस उपअधीक्षक व्ही.आर. बाजपेयी म्हणाले की, मातर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी १३ जणांना ताब्यात घेतले. ते म्हणाले की, या घटनेनंतर गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बाजपेयी पत्रकारांना म्हणाले, “गावच्या सरपंचाने एका मंदिरात गरब्याचे आयोजन केले होते. मुस्लिम समुदायाच्या जमावाने ते रोखण्याचा प्रयत्न केला.” जमावाने दगडफेकही केल्याचे त्यांनी सांगितले. ग्राम रक्षक दल (जीआरडी) जवान आणि एका पोलिसासह किमान सात जण जखमी झाले. तत्पूर्वी, खेडाचे पोलिस अधीक्षक राजेश गढिया यांनी सांगितले होते की, आरिफ आणि झहीर यांच्या नेतृत्वाखालील एक गट नवरात्री गरबा स्थळी घुसला आणि गोंधळ घातला.

Leave A Reply

Your email address will not be published.