इसम नदीच्या पुरातून सुखरूप बचावला (व्हिडीओ)

0

 

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

काल दिवसभरापासून सुरू असलेल्या पावसाने रावेर तालुक्यातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले. तसेच वाघोड गावावरून मोरगाव बुद्रुक गावाकडे येणारी नदी दुथडी भरून वाहत होती. रावेर वरून मोरगावकडे जाण्यासाठी सर्व मार्ग बंद होते.

अशातच मांगी तालुका रावेर येथील रहिवाशी व मोरगाव बुद्रुक येथील सासुरवाडी असलेल्या गजानन कोळी या वय 42 वर्ष या इसमाने मोरगाव बु.येथे जाण्यासाठी वाघोड या गवावरून जाण्याचे ठरवले. दुपारी चार वाजता पाऊस थांबल्यानंतर त्यांनी लागवड गावावरून मोरगावकडे जाणारा पायी रस्त्याचा वापर केला.

यावेळी वाघोड येथील रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या रस्त्याचा वापर केला. परंतु सदरच्या रस्त्यात नदीला पूर आल्यामुळे रस्त्यामध्ये पाणी वाहत होते. सदरच्या पाण्यामधून मार्ग काढत असताना गणेश कोळी यांचा पाय घसरून तो पाण्याचा प्रवाह बरोबर नदीमध्ये वाहून जातानांचा व्हिडिओ तिथे असलेल्या काही तरुणांनी व्हायरल झाला.

व्हिडिओत सदरचा इसम नदीच्या पुरामध्ये वाहून जाताना दिसत आहे. परंतु तो इसम काही अंतरावर वाहून गेल्यावर त्याला पोहता येत असल्यामुळे सुखरूप बचावला व मोरगाव बु. येथे सासुरवाडीला ठणठणीत चालत आला. यामुळे सर्वांनी सुटकेचा निः श्वास टाकला.

Leave A Reply

Your email address will not be published.