जळगाव जिल्ह्यात मुगाला मिळाला १४ हजारांचा भाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. दरम्यान हंगामातील पहिल्या मोजणीस पारोळा कृउबात मुगाला १४ हजार रुपयांचा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

दिनांक ३१ रोजी पारोळा येथे मूग काटा मोजणी होऊन यात या हंगामातील पहिल्या मोजणीस तब्बल १४००१ रूपयांचा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. या वेळी काटा मोजणी सभापती डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

सावखेड होळ येथील शेतकरी बाबुराव धनसिंग पाटील यांच्या शेतातील मूग मोजला गेला. यावेळी उपसभापती सुधाकर पाटील, सचिव दीपक पाटील, व्यापारी किरण वाणी, नामदेव वाणी, संदेश वाणी, रतन महाजन यांच्यासह काही संचालक उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सतीश पाटील यांनी येणाऱ्या काळात पारोळा बाजार समितीकडून शेती मालास रास्त भाव दिला जाईल, असे सांगितल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.