शेतकऱ्यांनो नियोजन करा, हवामान विभागाचा सल्ला

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात पावसाने पुन्हा एकदा पाठ फिरवली आहे. यामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. दरम्यान पुणे हवामान विभागाने पावसासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.

हवामान विभागाचा सल्ला

 

पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता या महिन्यात पाऊस नसणार आहे. सरळ सप्टेंबर महिन्यात पावसाचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नियोजन करावे.  राज्यात गेल्या ८ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आता ऑगस्ट महिन्याचा फक्त एक आठवडा राहिला आहे. या एका आठवड्यातही राज्यात पाऊस नाही. आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होईल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.