“अजित पवार यांना पुन्हा संधी नाही, त्यांनी ती मागू देखील नाही”; शरद पवार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या केलेल्या वक्तव्याबाबत शरद पवार यांनी नकार दिला आहे. “अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी म्हणालो नाही,” असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. सुप्रिया त्यांची धाकटी बहीण आहे. बहीण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले. साताऱ्यात माध्यमांशी बोलतांना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं. यानंतर साताऱ्यात बोलतांना शरद पवार यांनी अजित पवार यांना चांगलेच ठणकावले आहे. अजित यांना पुन्हा संधी नाही. त्यांनी संधी मागू देखील नाही. पहाटेच्या शपतविधीनंतर एकदा संधी दिली होती. आता अजित पवार यांना पुन्हा संधी नाही.

शरद पवार यांच्याबाबत विरोधी पक्षांच्या मनात शंका?
अजित पवार बंडखोरी करत काही आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाले होते. मात्र तरी देखील शरद पवार यांनी अजित यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील झाल्यापासूनच शरद पवार यांच्याबाबत विरोधी पक्षांच्या मनात शंका आहे.

या राजकीय घटनेनंतर शरद पवार यांनी अजित पवार यांची अनेकदा भेट देखील घेतली आहे. नुकतीच एका व्यावसायिकाच्या घरी दोन्ही नेत्यांची गुप्त बैठक झाली होती. यानंतर काँग्रेसने शरद पवारांना परिस्थिती सावरण्यास सांगितले होते. मात्र, शरद पवार हे केंद्रातील भाजप सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.