मोबाईल चोरी… आली जिव्हारी; चोरास 15 किमी लटकवत नेले…(व्हिडीओ)

0

 

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

गुन्हेगारांच्या दहशतीमुळे बिहारमधील जनता अत्यंत सावध झाली आहे. ट्रेनमध्ये अनेकदा चोर असतात जे क्षणार्धात आमच्या मौल्यवान वस्तू चोरतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल.

वास्तविक, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका चोराला ट्रेनमध्ये चोरी करताना पकडण्यात आले आहे. त्यानंतर प्रवाशांनी त्याला पकडून ट्रेनच्या बाहेर खिडकी बाहेर लटकवले. चोराचे नाव पंकज कुमार असल्याचे समजते. चोराला घडलेली अद्दल हि आयुष्यभर लक्षात राहील अशीच आहे. यामुळे इतर चोरही चोरी करण्याआधी किमान 10 वेळा तरी विचार नक्कीच करतील.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 14 सप्टेंबरच्या रात्री घडली. बेगुसरायहून खगरियाकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये साहेबपूरकमल स्टेशनजवळ ही घटना घडली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.