जळगावातून चोरटयांनी दोन मोबाईल लांबवीले

0

जळगाव ;- तरुणाच्या घरातून त्याचे दोन मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना जळगाव शहरातील खान्देश मिल कॉलनी परिसरात घडली आहे. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीसस्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

कौशल सुनील जैन वय २३ हा तरुण जळगाव शहरातील खान्देश मिल कॉलनी येथे वास्तव्यास आहेत. २६ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्याने घरातील कौशल याचे १४ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरुन नेले. अवघ्या आठ मिनिटात चोरट्याने ही चोरी केली, घरात मोबाईल मिळत नसल्याने कौशल याने शोध घेतला, मात्र मोबाईल मिळून आले नाही, अखेर चोरीची खात्री झाल्यावर तीन दिवसानंतर सोमवारी दुपारी कौशल याने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक संदीप पाटील पुढील तपास हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.