अभिनेते ‘मिथुन चक्रवर्ती’ यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दोन दिवसांपूर्वी कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिथुन यांना अचानक छातीत दुखू लागते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिथुन यांना ब्रेनस्ट्रोक झाला होता. असं म्हटलं जात होत. सध्या मिथुन यांच्यावर उपचार सुरु आहेत. आता मिथुन यांचा रुग्णालयातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये भाजप नेते दिलीप घोष हे मिथुन यांना गुलाबाचे फूल देताना दिसत आहेत.

मिथुन यांचा रुग्णालयातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मिथुन चक्रवर्ती हॉस्पिटलच्या बेडवर बसलेले दिसत आहेत. तर, दिलीप घोष त्यांना गुलाबाचे फूल देताना दिसत आहे. भाजप नेते सुकांता मजुमदार यांनी देखील मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली आहे.

छातीत तीव्र वेदना होत असल्याने मिथुन यांना नेण्यात आले, जिथे त्यांच्या मेंदूच्या एमआयआय, रेईओलॉजी आणि प्रयोगशाळेच्या चाचण्या करण्यात आल्या. रिपोर्टनुसार, मिथुन चक्रवर्ती यांना इस्केमिक सेरेब्रोव्हस्कुलर अपघात झाला आहे. जो मेंदूच्या नुकसानाशी संबंधित आहे. सध्या डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.