तहसील कार्यालयात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न 

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जालना तालुक्यातील पाचन वडगाव, हिस्वन आणि थेरगाव येथील ग्रामस्थांनी गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाविरुद्ध जालना तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान एका महिला आंदोलकाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

जालना तालुक्यातील काही गावातील गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे. जालना तहसील कार्यालय आवारात हे ठिय्या आंदोलन सुरु असून, या आंदोलनाच्या दरम्यान आंदोलक महिलेने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलीस व अन्य आंदोलकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या घटनेने तहसील कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.

आंदोकांसोबत तहसीलदार चर्चेला  

घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तहसीलदार कार्यालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला. यावेळी आंदोलक आणि तहसीलदार छाया पवार यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरु असून, आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.