दीपक वाणी यांना कुलगुरू विजय माहेश्वरी यांच्या हस्ते पीएचडी प्रदान

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दीपक वाणी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत पीएचडी प्रदान करण्यात आली. दीपक वाणी यांचा संशोधनाचा विषय “महाराष्ट्रातील खाजगी पर्यटन संस्थांच्या धोरणांचा पर्यटकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास”. संशोधनाचे महत्त्वाचे निष्कर्ष म्हणजे खाजगी पर्यटन संस्थांच्या योग्य धोरणांचा आणि कार्यपद्धतीचा सकारात्मक परिणाम पर्यटकांवर होतो. खाजगी पर्यटन संस्थांची ध्येयधोरणे पर्यटकांना आकर्षित करतात, त्यामुळे पर्यटकांची संख्या, व्यवसाय वाढीस लागतो. खाजगी पर्यटन संस्थांचे धोरण ग्राहकाभिमुख असते. संशोधनात संस्थांच्या कोणत्या घटकांचा, धोरणांचा पर्यटकांवर प्रभाव असतो यासाठी संशोधक दीपक वाणी यांनी 25 घटक निश्चित केले व त्यांचा पर्यटकांवर होणारा परिणाम अभ्यासला. संशोधक वाणी यांनी उपाययोजना सुचवताना खाजगी पर्यटन कंपन्यांच्या व्यवसाय वाढीसाठी पर्यटन मॉडेल प्रस्थापित केले.

या मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे विषय तज्ञ डॉ. शिवरात्री चंद्रमौळी यांनी हे मॉडेल उस्मानिया विद्यापीठात टुरिझम अँड हॉस्पिटल हॉस्पिटल या अभ्यासक्रमात हे मॉडेल समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करेल असे सांगितले. संशोधनासाठी मार्गदर्शक माजी प्राचार्या डॉ. मीनाक्षी वायकोळे, पी ओ नहाटा महाविद्यालय भुसावळ व प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी, बोदवड कला वाणिज्य महाविद्यालय बोदवड, प्रा. डॉ. रश्मी शर्मा, पी.ओ नहाटा महाविद्यालय भुसावळ या सर्वांनी मार्गदर्शन केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी महाराष्ट्र विद्यापीठ विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक विजय माहेश्वरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

दीपक वाणी हे मुंबईच्या प्रसिद्ध एसप्लेनेड कनिष्ठ महाविद्यालय, कांदिवली, मुंबई येथे वाणिज्य शाखेत कार्यरत आहेत. दीपक वाणी यांचे त्यांच्या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री जयेश भाई मजेठीया सर व प्राचार्य ,शिक्षक वर्ग, समाजातील प्रतिष्ठित मंडळी मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.