‘मिर्झापूर’चा सीजन ३ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरीजचे नेहमीच चर्चा होत असते. गुन्हेगारी विश्वावर बेतलेल्या या वेबसीरीजचे आतापर्यंत दोन सीझन आले असून, आता प्रेक्षक तिसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहे. शेवटचा सीझनने चाहत्यांना कथेच्या मध्यभागी सोडले आणि त्यांना आश्चर्यचकित केले असल्याने या सीरिजच्या तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षक फार उत्सुक असल्याचं दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मिर्झापूरच्या तिसया भागाची शूटिंग पूर्ण झाली आहे. ‘मिर्झापूर’च्या आगामी सीझनमध्ये प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार ?, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. कालीन भैय्या त्यांच्या मुलाच्या खुनाचा बदला घेणार की गुड्डू भैय्या हाच ‘मिर्झापूर’चा राजा कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनमध्ये मिळणार आहे. याबद्दल प्रेक्षकांना खूपच उत्सुकता आहे. मिर्झापूरचा तिसरा सीझन मार्च २०२४ मध्ये OTT वर रिलीज होणार आहे.

याआधीही मालिकेच्या कथेबाबत काही मोठे खुलासे झाले आहेत. रिपोर्टनुसार, सिझन ३ मध्ये प्रेक्षकांना एक वेगळी कथा पाहायला मिळणार आहे. मिर्झापूर ३च्या कथेत त्रिपाठी आणि पंडित कुटुंबातील भांडणातून एक नवी स्टोरी मिळणार आहे. खुर्चीला खिळवून ठेवणारे कथानक पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.