पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा तालुक्यातील एका गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात नऊ वर्षाच्या चिमुकलवर तोंड दाबुन अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावात नऊ वर्षाच्या चिमुकलवर नर्सरीच्या शेडमध्ये अत्याचार केला. दुपारी एक ते दीडच्या दरम्यान पिडीत मुलगी व त्याचा भाऊ हे शेतात काम करीत असताना आरोपी हिरालाल अमरसिंग बारेला यांने पिडित मुलीच्या भावाला लिंबू घेण्यासाठी पाठविले. नंतर मुलगी एकटी असल्याचे पाहून तिचे तोंड दाबून अत्याचार केला.
दरम्यान सदर प्रकार पिडीतेने आपल्या आईला सांगितले. पिडीतेच्या आईने तात्काळ पारोळा पोलीस स्टेशन गाठून आरोपी हिरालाल अमरसिंग बारेला (रा. शेनपाणी ता. चोपडा) याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहे.