दहावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

पारोळा शहरातील दिल्ली दरवाजा भागातील नम्रता फासगे या  विद्यार्थिनीने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा शहरातील दिल्ली दरवाजा भागातील रहिवासी नम्रता भास्कर फासगे (वय १६) या तरूणीने रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. नम्रता पारोळा येथील एका खासगी शाळेत दहावीच्या वर्गात शिकते. सध्या ती परीक्षा देत होती. या युवतीने घरातील लोखंडी रॉडला ओढणीच्या साहाय्याने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

दरम्यान परिसरात ही घटना कळताच तिला खाली उतरवून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अलका निरमुळे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.