धक्कादायक.. १६ वर्षीय मुलगी अत्याचारातून गर्भवती

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी आरोपीवर चाळीगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राकेश युवराज जिरे (वय २२) याने १६ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तुझ्या आई वडिलांना व भावाला जीवे ठार मारून टाकेल अशी धमकी देऊन  पिडीत मुलीवर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती झाली.

दरम्यान  या प्रकरणी संशयित आरोपी राकेश युवराज जिरे (वय २२) याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपस सपोनि धरमसिंग सूदरडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.