गुजरात निवडणूक; इसुदान गढवी हे AAP चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार… केजरीवाल यांची घोषणा…

0

 

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) राष्ट्रीय संयोजक (National Coordinator) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी इसुदान गढवी यांना ‘आप’ चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आहे.

अहमदाबादमध्ये पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. भारतीय निवडणूक आयोगाने काल गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. 182 जागांच्या विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्याचवेळी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबत ८ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.

जाणून घ्या कोण आहेत इसुदान गढवी

इसुदान गढवी (Isudan Garhvi ) यांचा जन्म 10 जानेवारी 1982 रोजी जामनगर जिल्ह्यातील पिपलिया गावात एका साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील खेराजभाई हे शेतकरी असून संपूर्ण कुटुंब शेती करते.

Leave A Reply

Your email address will not be published.