उद्धवजींच्या बुद्धीची कीव तर राऊत आऊट ऑफ – मंत्री महाजनांचा हल्लाबोल

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात दाखल झाले आहेत. यावेळी मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थिती आहे.  यावेळी गिरीश महाजनांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. पहा काय म्हणाले महाजन.. लोकशाही ~ लोकलाईव्हवर..

– शेवटच्या घटकापर्यंत योजना पदरात पडायला पाहिजे.

– योजनांचा लाभ घेण्यासाठी खेट्या माराव्या लागत होत्या म्हणून आमच्या सरकारने ठरवलं की तुम्ही इकडे खेट्या घालण्यापेक्षा आम्हीच तुमच्या दारामध्ये येतो.

– गरिबांचा देखील आर्थिक स्तर उंचावला पाहिजे . तो गरीब आहे तर त्याचा काय गुन्हा आहे म्हणून पंतप्रधान मोदींनी प्रत्येकाला घर देण्याचा निर्णय घेतला. असे  महत्वपूर्ण निर्णय घेणारे पंतप्रधान इतिहास एकच असतील.

– परवा आपले माजी मुख्यमंत्री येऊन गेलेत चांगलं  भाषण केलं. मला तर त्यांच्याबद्दल काय बोलावे तेच कळत नाही.  आम्ही राम मंदिरासाठी अनेक खेट्या घातल्या, आंदोलने केली ते राम मंदिर आता उभं राहतंय मोदीजी तिथे जाऊन उदघाटन करणार आहेत  आणि यांच्या डोक्यात काय कल्पना आली.. राम मंदिराचे निमित्त साधून आता तिथे हे दंगली , जाळपोळ करून आपली राजकारणाची पोळी  शेकणार आहेत. म्हणून मला उद्धवजींच्या डोक्याची  कीव करावीशी वाटते. त्या संजय राऊतांबद्दल तर बोलूच नका त्यांची कीव करायची गरज नाही ते आउट ऑफ आहेत. ते आपल्या डोक्याच्या बाहेर आहेत. पण उद्धवजींसारखे माजी मुख्यमंत्री असे वक्तव्य करतो की दंगली घडवण्यासाठी राम मंदिर बांधलं त्यासाठी मंदिराचे उदघाटन केलं. मला तर वाटते त्यांच्या बुद्धीची जेवढी कीव करावी तेवढी कमीच आहे. म्हणजे राजकारण कुठल्या स्तराला चालले आहे. कुठल्या स्तराला जाऊन तुम्ही टीका टिप्पणी करतात. म्हणून मला असं वाटतं कि आपण थोडं आवाक्यात राहून बोललं पाहिजे, आपल्याला शोभेल असं बोललं पाहिजे.

– देवेंद्र फडणवीसांबद्दल आपण काय काय वक्तव्य करतात,  काय त्यांच्या व्यंगा बद्दल बोलतात. अहो तुमच्या व्यंगाबद्दल बोलायला गेलो तर तोंड लपवत फिराल.  पण आमची ती संस्कृती नाहीय की तुमच्याबद्दल आम्ही असं बोलावं. मला वाटतं आपण एवढ्या मोठ्या पदावर राहिलेले आहात म्हणून बोलतांना आपण आपला तोल सांभाळला पाहिजे. परंतु आता मागे पुढे काही राहिलेले नाही. सेनेमध्ये त्याच्यामागे काय चार आमदार आणि दोन खासदार राहिलेत. आता मागे कोणी राहिले नाहीय. त्यांच्या पायाखालील वाळू सरकल्याने त्यांचा तोल ढासळल्याने ते असे वक्तव्य करायला लागले आहेत.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.