एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ‘बब्या’वर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई

0

जळगाव ;- श्रीगणेशोत्सव विसर्जन मुर्हतावर जळगाव जिल्हयांतील जळगाव शहरातील एमआयडीसी हद्दीतील एका अट्टल गुन्हेगारावर एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधीकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे . त्याची औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी कि , एमआयडीसी पो. स्टे, हद्दीतील स्थानबध्द आरोपी संतोष ऊर्फ बब्या सुभाष राऊत (कोळी) वय २४ रा. आयटीआय जवळ, कुसूंबा, ता. जि. जळगांव याचे विरुध्द तब्बल ९ गुन्हे दाखल होते. त्यामध्ये अवैध गावठी हातभट्टी दारू विक्रीचे ७ गुन्हे दाखल आहेत. त्याचा कुसुंबा गावामध्ये बस स्टॅन्ड जवळ गावठी हातभट्टी विक्रीचा अड्डा असून तेथून तो गावठी हातभट्टी दारूची विक्री करत होता. त्यामुळे कुसुंबा गावामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण हे व्यसनाधीन झाल्याचे दिसून येत आहे. . पोलिसांनी वेळोवेळी त्याच्या अड्ड्यावर छापा टाकून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली होती. परंतु त्याने त्याचा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवला ठेवला असल्याने त्याची कुसुंबा गावात प्रचंड दहशत होती. तो “हातभट्टीवाला” व धोकेदायक या संज्ञेत मोडत असल्यामुळे त्याच्यावर एमपीएडी कायद्यांतर्गत स्थानबद्ध कारवाईचा प्रस्ताव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, जयपाल हिरे यांनी पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्याकडे पाठवला होता .

त्याप्रमाणे प्रस्तावाचे अवलोकन करून ‘बब्या’ याला स्थानबद्ध होण्याची मंजुरी चा प्रस्ताव हा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठवण्यात येऊन त्यांनी काल दिनांक २९ सप्टेंबर रोजी त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. स्थानबद्ध बब्या याला पोउनि दिपक जगदाळे, सहायक फौजदार/अतुल वंजारी, पोहेकॉ गफ्फार तडवी, पोना/सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर साळवे इमरान सय्यद पोकों/साईनाथ मुंडे, संदिप धनगर आदींनी कुसुंबा येथून ताब्यात घेतले होते . त्याची आज रोजी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यासोबत पोलीस नाईक किशोर पाटील ,छगन तायडे ,किरण पाटील, यांनी त्यास औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध केले आहे . यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील दामोदरे, ईश्वर पाटील यांचे सहकार्य लाभले.

आरोपी संतोष ऊर्फ बब्या सुभाष राऊत (कोळी) याला पोलीस अधिक्षक एन. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पोलीस निरीक्षक नजन पाटील .एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी कारवाई केली. दरम्यान अवैध दारू विक्री करणारा आझाद कंजर याच्यावर देखील अशाच प्रकारची कारवाई झालेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.