ऑक्टोबरमध्ये 16 दिवस बँका बंद, अशा आहेत सुट्ट्या

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुम्हालाही बँकेची कामे करायची असतील तर लवकर करा कारण ऑक्टोबर महिन्यात 16 दिवस बँका बंद राहतील. यात सार्वजनिक सुट्या, रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार यांचा समावेश आहे. ऑक्टोबरमधील 31 दिवसांपैकी 16 दिवस सुट्ट्या असल्याने तुम्हाला नीट नियोजन करावे लागेल. ऑक्टोबरमधील 16 दिवसांच्या सुट्टीमध्ये सर्व रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार समाविष्ट आहे. म्हणजेच ऑक्टोबरमध्ये सणांमुळे 10 दिवस बँका बंद राहणार आहेत. उर्वरित 6 दिवस बँक साप्ताहिक सुट्टीमुळे बंद राहणार आहे. कोणत्या बँका बंद राहतील अशा सुट्ट्यांची संपूर्ण यादी जाणून घेऊया.

अशा असतील सुट्ट्या

2 ऑक्टोबर (सोमवार) – गांधी जयंती – राष्ट्रीय सुट्टी

14 ऑक्टोबर (शनिवार) – महालय-कोलकाता येथे बँका बंद

18 ऑक्टोबर: (बुधवार) – काटी बिहू – आसाममध्ये बँका बंद

21 ऑक्टोबर शनिवार – दुर्गा पूजा (महा सप्तमी) – त्रिपुरा, आसाम, मणिपूर आणि बंगालमध्ये बँका बंद

23 ऑक्टोबर (सोमवार) – महानवमी), आयुधा पूजा, दुर्गा पूजा, विजय दशमी – त्रिपुरा, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश, कानपूर, केरळ, जराखंड, बिहारमध्ये बँका बंद

24 ऑक्टोबर (मंगळवार) – दसरा म्हणजेच विजयादशमी, दुर्गा पूजा – आंध्र प्रदेश, मणिपूर वगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद

२५ ऑक्टोबर (बुधवार) – दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद

२६ ऑक्टोबर (गुरुवार) – दुर्गा पूजा (दसैन)/ विलीनीकरणाचा दिवस – सिक्कीम, जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद

27 ऑक्टोबर, (शुक्रवार) दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद

28 ऑक्टोबर (शनिवार) – लक्ष्मी पूजा – बंगालमध्ये बँका बंद

३१ ऑक्टोबर (मंगळवार) – सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन – गुजरातमध्ये बँका बंद

Leave A Reply

Your email address will not be published.