बालाजी नगरीत बाप्पांना उत्साहात निरोप

0

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पांना बालाजी नगरीत उत्साहात निरोप देण्यात आला. यानिमित्त निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांनी समाज प्रबोधनात्मक व धार्मिक देखावे सादर केले. तर श्री गणेशोत्सव प्रोत्साहन समितीतर्फे गणेश मंडळाचा शाल, टोपी, पुष्पहार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

श्री विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळांनी आपल्या गणेश मंडळासमोर विविध धार्मीक, आध्यात्मिक व सामाजिक देखाव्याचे सादरीकरण केले. तसेच टिपरी नृत्य, वारकरी दिंडी, ढोल ताशाचा गजर व बँड पथकाच्या तालावर विविध गीताचे सादरीकरण करण्यात आले. श्री गणेशोत्सव प्रोत्साहन समितीचे अध्यक्ष गणेश सवडे कार्याध्यक्ष राजेश भुतडा संघटक अँड घनःशाम भाला, कोषध्यक्ष सूरज गुप्ता, सचिव विनोद जयस्वाल, मानद सदस्य राजे विजयसिंह जाधव, माजी आ.डॉ शशिकांत खेडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार मालवीय, मुख्याधिकारी अरुण मोकळ, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, तहसीलदार श्याम धनमने, समितीचे उपाध्यक्ष राजेश इंगळे, गजानन तिडके, बळीराम मापारी, नवनाथ गोमधरे, प्रकाश खांडेभराड, सुजित गुंडे, अरविंद खांडेभराड, पवन बोराटे, कैलास धन्नावत, समन्वयक मधुकर रायमुल ब्रिजमोहन मल्लावत, नरोडे सर, अशरफ पटेल, शंकर वाघमारे, मंगेश तिडके, संचित धन्नावत तथा पत्रकार संघटनेचे  पदाधिकारीसह जेष्ठ सदस्य वसंतअप्पा खुळे, डॉ सुनील कायंदे, मनोज कायंदे, संतोष खांडेभराड, गोविंद झोरे ,गोपाळ व्यास, सन्मती जैन, नंदलाल शर्मा, डॉ शंकर तलबे, दादा व्यवहारे, रमेश कायंदे, नंदन खेडेकर, प्रवीण धन्नावत, पवन झोरे, शिवाजी वाघ, जहीर पठाण आदींची यावेळी उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.