नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
दोन हजार रुपयांच्या नोटा बद्दल मोठी बातमी आहे. दोन हजार रुपयांच्या बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) वाढवली आहे. उद्यापासून 2000 रुपयांच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत. बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवली आहे.
आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता, नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत मिळाली आहे.