कतरिनाचा ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटाची तारीख जाहीर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) सध्या ही जोडी चर्चेत आहे. त्यांचा ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीजडेट जाहीर केली आहे.

या दिवशी येणार भेटीला
कतरिनाने सोशल मीडियावर ‘मेरी ख्रिसमस’चं नाव पोस्टर शेअर केलं आहे. तसेच पोस्टर शेअर करत तिने या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा सिनेमा १५ डिसेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मेरी ख्रिसमस’च्या नव्या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल होत आहे.

कतरिनाचे आगामी प्रोजेक्ट
कतरीना तिचा ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात ती बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत (Salman Khan) अॅक्शन करताना दिसणार आहे. इमरान हाशमीदेखील या सिनेमात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. तसेच शाहरुखची झलकही या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.