अरे बापरे.. खासदारांच्या फुकट प्रवासासाठी कोट्यवधींची उधळपट्टी

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशाचे भवितव्य हे लोकप्रतिनिधींवर अवलंबून असते. मात्र खासदारांबद्दल एक धक्कादायक माहिती उघडकीस आलीय. देशातील वर्तमान खासदारांसह माजी खासदारांसाठी केंद्र सरकारने कोट्यवधींची उधळपट्टी केल्याची माहिती समोर आलीय. खासदारांच्या मोफत रेल्वे प्रवासासाठी तब्बल 62 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

गेल्या पाच वर्षांत ही रक्कम खर्च करण्यात आली आहे. म्हणजेच संसदेच्या सदस्यांनी देशभरात केलेल्या मोफत प्रवासासाठी केंद्र सरकारने 62 कोटी रुपये मोजले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतू,ज्या कोरोना काळात देश लॉकडाऊनमध्ये होता, त्या काळातही खासदार महाशयांनी मोफत रेल्वे प्रवास केला आहे. या सुविधाचा खासदारांनी दणकावून फायदा उठवला आहे. माहिती अधिकार कायद्याचा (Right to Information) वापर करत ही माहिती उघड झाली आहे.  2020-21 या काळात खासदारांनी जवळपास 2.5 कोटी रुपयांचा मोफत रेल्वे प्रवास केला आहे.

नियमानुसार, संसद सदस्यांना रेल्वेत फर्स्ट क्लास सोबतच एक्झिकिटिव्ह क्लासचा मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येते. एवढे नाही तर, खासदारांच्या पत्नीलाही  यांना काही अटींवर मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा देण्यात येते. सध्याच्या खासदारांसोबतच संसदेचे माजी सदस्य असलेल्या माजी खासदारांनाही मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा देण्यात येते. एका सहका-यासोबत माजी खासदाराला सेंकड क्लास एसी डब्ब्याचा रेल्वे प्रवास मोफत असतो. माजी खासदार एकट्यानेच प्रवास करत असतील तर त्यांना फर्स्ट क्लास एसीचा मोफत प्रवासाची मुभा देण्यात येते.

मध्यप्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारात खासदारांच्या रेल्वे प्रवासाविषयी माहिती मागितली होती. लोकसभा सचिवालयाने त्यांना आरटीआय अंतर्गत ही माहिती दिली आहे. त्यात सध्याच्या खासदारांच्या मोफत रेल्वे प्रवासावर 35.21 कोटी तर माजी खासदारांच्या रेल्वे प्रवासासाठी 26.82 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती दिली. हा सर्व खर्च 2017 ते 2022 या कालावधीत करण्यात आला आहे. 2020-21 या काळात देश कोरोनाशी दोन हात करण्यात गुंतलेला असताना खासदारांच्या मोफत रेल्वे प्रवासावर या काळात 2.5 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये सध्याच्या खासदारांच्या मोफत प्रवासावर 1.29 कोटी तर माजी खासदारांच्या मोफत रेल्वे प्रवासावर 1.8 कोटी रुपयांचे बिल आले.

Leave A Reply

Your email address will not be published.