यावल अभयारण्यातील ७७ अनधिकृत झोपड्या हटविल्या

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल अभयारण्यात जामन्या व नक्षत्र हद्दीतील लंगडा आंबा परिमंडळ आणि करंज पाणी मधील ७७ झोपड्या व वन जमिनी वनविभागाने ताब्यात घेतले असून  त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सहाय्यक वनरक्षक अश्विनी खोपडे यांचे आदेशानुसार वनपरिक्षेत्र पाल अधिकारी अमोल चव्हाण यांचे नेतृत्वाखाली यावल अभयारण्यात जामन्या वनक्षेत्र व लंगडा आंबा परिमंडळ आणि करंज्या पाणी मधील ७७ झोपड्या हटवण्यात आल्या असून या कार्यक्षेत्रातील 106 अनाधिकृत अधिक्रमणधारकांचे 264.36 हेक्टर वन जमिनी अतिक्रमित निष्काशन करून नियमानुसार त्या वनविभागाने ताब्यात घेतले आहेत.

या कारवाई प्रसंगी पोलीस महसूल विभाग आणि अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.  जळगाव पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक अशीच कांबळे यांनी मनुष्यबळ आणि संरक्षण उपलब्ध करून दिले. यावेळी यावल अभयारण्य यावल वन विभागातील वनपाल, वनरक्षक तसेच राज्य राखीव दलाचे जवान उपस्थित होते.  पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून समतोल चर चाऱ्या खोल घेऊन त्या वाढवण्यात आल्या अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे यांनी प्रसिद्धी द्वारे दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.