मातांच्या निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक मूठभर बदाम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रत्येक बाळाची आई म्हणजेच माता या कुटुंबाचा आधारस्तंभ असतात. प्रत्येक आईसाठी मग ती नोकरी करणारी असो किंवा गृहिणी परंतु आई म्हणजे वचनबद्धतेची एक न संपणारी यादीच असते. मात्र या मातांच्या आरोग्याची देखील काळजी घ्यायला पाहिजे.

निरोगी जीवन जगण्यासाठी योग्य पोषण आणि आरोग्यदायी सवयी आवश्यक आहेत. तथापि त्यांच्या व्यस्त वेळापत्रकाप्रमाणे मातांना क्वचितच स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ मिळतो. या माता आपल्या कुटुंबाची जितकी काळजी तितकीच त्यांना स्वतःचीही सवय लावली पाहिजे. एक चांगली सुरवात म्हणजे नियमित व्यायामासाठी वेळ काढला पाहिजे आणि संतुलित आहार समाविष्ट करणेदेखील महत्वाचे आहे.

जेवणादरम्यान मातांना स्नॅक्स ऐवजी मूठभर बदाम दिले तर वनस्पतीतील प्रथिने, कॅल्शिअम, लोह, व्हिटॅमिन इ. मॅग्नेशियम आणि जस्त इतर महत्वपूर्ण पोषक तत्वांव्यतिरिक्त मिळतात. बदामाचे नियमित सेवन केल्यास मातांना निरोगी जीवनशैली जगण्यास मदत होते.

स्तनदा मातांसाठी पोषणाचे महत्व सांगताना आहारशास्त्रज्ञ रितिका सामदार म्हणतात, मातांसाठी चांगले पोषण महत्वाचे आहे. विशेषतः गर्भधारणेनंतर हे आईच्या दुधाची गुणवत्ता सुधारू शकते. आणि प्रसूतीनंतरच्या काळात बरे होण्यास मदत देखील होते. या काळात स्तनपान करणाऱ्या मातांनी आहारात समृद्ध अन्न म्हणजे अंडी, दूध आणि फळांचा समावेश करावा. निरोगी स्नॅकिंगसाठी माता मूठभर बदाम रोज खाऊ शकतात. कारण बदाम पौष्टिक असतात. बदामामध्ये असणारे फोलेट, लोह, नियासिन, थायामीन, झिंक आणि पोटॅशिअम हे निरोगी जीवनासाठी आवश्यक असते.

संकलन –संयोजन
सुबोध रणशेवरे
संपर्क -९८३३१४६३५६

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.