मास्टर कॉलनीत घरफोडी… गुन्हा दाखल…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

शहरात पुन्हा एकदा चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मास्टर कॉलनीतील रहिवासी मेहरून्नीसा शेख नियाजोद्दीन (वय-५६)या आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्यात त्यांचासोबत मुलगा तौफिक व सुन नाजमीन हे राहतात. मुलगा व सून हे दोघे कामानिमित्ताने नगरदेवळा येथे गेले होते. त्यामुळे मेहरून्नीसा शेख ह्या शेजारी राहणारा आपल्या पुतण्याकडे २८ जुलै रोजी रात्री झोपण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्या होत्या. त्यावेळी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातून दागिने आणि रोकड असा तब्बल ४० हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे आज रोजी सकाळी उघडकीस आले. याबाबत एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.