चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत एका माथेफिरूने रागाच्या भरात लोखंडी पात्याने तिच्या कानाजवळ जोराने वार करत तिचा खून केल्याची घटना घडली आहे. वार केल्यानंतर माथेफिरू पती घटनास्थळावरून फरार झाला आहे. सदर घटनेबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लीलाबाई ग्यानसिंग बारेला (वय २५, रा.धवली ता.वरला जि.बडवानी, सध्या गोरगावले शिवार, चोपडा) असे मृत महिलेचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, लीलाबाई बारेला आणि तिचा पती ग्यानसिंग बारेला हे दोघे चोपडा तालुक्यातील गोरगावले शिवारात राहत होते. पत्नी लीलाबाई यांच्यावर चरित्र्याच्या संशयावरून पती ग्यानसिंग बारेला हा याआधीही नेहमी तिला मारहाण करत होता. लिलाबाई व टेम्बऱ्या मन्साराम बारेला (वय-२३) यांच्यात काहीतरी सुरु असल्याच्या संशयावरून वाद झाल्याने रागाच्या भरात पती ग्यानसिंग बारेला याने शेतात लागणारे लोखंडी कोळपणेची पाते घेवून पत्नी लिलाबाईच्या कानावर वार केले. यात लिलाबाई गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर पती ग्यानसिंग बारेला हा घटनास्थळाहून फरार झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.