गुजरात विद्यापीठात अफगाणच्या विद्यार्थ्यांना मारहाण

0

 

नवी दिल्ली : अहमदाबादस्थित  गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात ग शनिवारी रात्री उशिरा अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, 5. श्रीलंका आणि आफ्रिका खंडातील र काही विद्यार्थ्यांना जमावाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. गळ्यात उपरणे व जय श्रीरामच्या रा घोषणा देत जमावाने विदेशी =विद्यार्थ्यांना चोप दिला. त्यांच्यावर ने दगडफेक करत वाहनांची तोडफोड च केली. यात ५ जण जखमी झाले  असून त्यांना रुग्णालयात भरती केले आहे. वसतिगृहात नमाज ग पठण केल्यावरून विद्यापीठात ळ वाद झाल्याचे समजते. याप्रकरणी ते पोलिसांनी दोघांना अटक केली.

गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहातील ‘अ’ ब्लॉकमध्ये १६ मार्च रोजी रात्री मारहाण झाल्याचा प्रकार घडला. या घटनेविषयी
पीडित विदेशी नागरिकांनी सांगितले की, रमजान महिना सुरू असल्यामुळे आम्ही नमाज पठण करत होतो. यावेळी तिघांनी येऊन विरोध केला. थोड्याच वेळात २०० जणांचा जमाव तिथे आला व त्यांनी अचानक ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. काही जण वसतिगृहात घुसले. लॅपटॉप, एसी, कपाट, टेबल, दरवाजे, म्युझिक सिस्टिम तोडले. दारात उभ्या असलेल्या दुचाकींची त्यांनी तोडफोड केली, असे पीडितांनी सांगितले. याप्रकरणी २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर, राज्याचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी आपत्कालीन बैठक घेतली. पोलिसांना कारवाईचे आदेश त्यांनी दिले. याप्रकरणी कठोर कारवाई केली जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.