तरूणाला लोखंडी रॉड व लाकडी काठीने बेदम मारहाण ; गुन्हा दाखल

0

जळगाव ;- जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला लोखंडी रॉड व लाकडी काठीने बेदम मारहाण करत डोक्याला दुखापत केल्याची घटना शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता शहरातील अमन पार्क शिवाजी नगरात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नदीम अहमद शेख सलीम वय ३० हा तरूण शिवाजी नगरातील अमन पार्क येथे राहायला असून मोबाईल दुरूस्तीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास नदीम हा त्यांच्या घरी असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच परिसरात राहणारे शेख रईस शेख रशिद, आलम शेख रशीद, हमु शेख रशीद आणि शेख रशिद या चार जणांनी लोखंडी रॉड डोक्यात टाकला तर लाकडी काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणी नदीम याच्या डोक्याला दुखापत झाली. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे शेख रईस शेख रशिद, आलम शेख रशीद, हमु शेख रशीद आणि शेख रशिद रा. अमन पार्क शिवाजी नगर या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय झाल्टे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.