धुळ्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ, ५ जणांना अटक

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

धुळ्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अशात धुळे स्थानिक गुन्हे अशात धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला असून चोरीला गेलेल्या जवळपास १२ मोटेलसायकली ताब्यात घेतल्या आहे. तसेच या घटनेत पाच जणांच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत.

शहरात सतत दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपास सुरु केला. तपासात मोठी टोळी सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपास सुरू केला असता या कारवाईदरम्यान जवळपास ५ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून जवळपास १२ दुचाकी वाहने पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्यातील सहा दुचाकी वाहने हे विविध गुन्ह्यांमध्ये असल्याचे आढळून आले आलेय.

इतर ६ वाहने कुठली आहे, त्याचा देखील पुढील तपास पोलीस करत आहे. ही वाहने जिल्ह्यासह जिल्हा बाहेरून चोरली असल्याचे उघडकीस आले आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.