गुळण्या करण्यासाठी चुकून फिनाईलचे पाणी पिल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

0

धरणगाव ;- चुकून बादलीतील फिनाइलचे पाणी महिलेने सकाळी गुळण्या करण्यासाठी पिल्याने तिची प्रकृती खालावून महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. २२ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे.

केवलबाई गुलाब पाटील (वय ६२, रा. अनोरे ता. धरणगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. बुधवारी दि. २२ मे रोजी सकाळी घरामध्ये नेहमीप्रमाणे महिलांची घरकामे सुरू होती. त्यावेळेला फरशी पुसण्यासाठी बादलीमध्ये फिनाईल पाणी टाकण्यात आले होते. केवलबाईंना ते माहिती नसल्याने त्यांनी चुकून ते पाणी गुळण्या करण्यासाठी तोंडात टाकले.

त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ कुटुंबीयांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून केवलबाई यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. दरम्यान अनोरे येथील पाटील कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून धरणगाव तालुक्यात हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.
मयत महिलेच्या पश्चात पती, तीन मुले, सुना असा परिवार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.