जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतले संत मुक्ताईचे दर्शन
कोथळी येथील जुने मुक्ताई मंदिराच्या जीर्णोद्धाराची घेतली माहिती
मुक्ताईनगर लोकशाही न्युज नेटवर्क-
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्या आई अमिता प्रसाद यांच्या समावेत सोमवारी 20 मे रोजी दुपारी मुक्ताईनगर व कोथळी येथील आदिशक्ती संत मुक्ताई चे दर्शन घेतले. यावेळी मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह भ प रविंद्र महाराज हरणे यांनी नवीन मंदिरात तर जुने कोथळी मंदिरात मंदिराचे व्यवस्थापक ह भ प उद्धव महाराज जुनारे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व त्यांच्या मातोश्री अमिता प्रसाद यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. याप्रसंगी उद्धव महाराज यांच्या कडून कोथळी येथील जुने मुक्ताई मंदिराचे जीर्णोद्धार कामाची माहिती जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतली मंदिराचे उर्वरित काम सुरू करण्याबाबत संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरून सूचना दिल्या या ठिकाणी तहसीलदार गिरीश वखारे, तलाठी पी.पी.दाणे, कोतवाल नितीन घोरपडे, ह भ प पंकज महाराज, ज्ञानेश्वर हरणे व आदि उपस्थित होते.