सोने चांदीच्या दराने गाठला उच्चांक, पहा आजचे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर वाढतच आहेत. ऐन लगीनसराईच्या काळात सोने चांदीचे भाव वाढल्याने ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. आज बुधवारी (29 नोव्हेंबर) रोजी सलग दुसऱ्या दिवशी सर्वकालीन उच्चांक गाठला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, 10 ग्रॅम सोने 862 रुपयांनी महागले आणि 62,775 रुपयांना विकले गेले. कालही सोन्याने आपला सार्वकालिक उच्चांक गाठला होता. तेव्हा त्याची किंमत 61,913 रुपये प्रति 10 ग्रॅम होती.

त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून आली आहे. चांदी 861 रुपयांनी महागली असून 75,750 रुपये किलोवर पोहोचली आहे. पूर्वी ती 74,889 रुपये होती. या महिन्यात आतापर्यंत चांदी पाच हजार रुपयांनी महागली आहे.या महिन्यात आतापर्यंत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 60,896 रुपये होता, तो आता 62,775 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. या महिन्यात आतापर्यंत चांदीच्या दरात 4,925 रुपयांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी तो 70,825 रुपये होता, तो आता 75,750 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

जळगाव येथील सराफ व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचा सोन्याचा दर 62550 रुपये आहे तर चांदीचा दर 76000 रुपये आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शेअर बाजारात सुरू असलेल्या चढउतारांमुळे सोन्याला आधार मिळत आहे. त्यामुळे पुढील एका वर्षात हे सोने 67 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाऊ शकते. तसेच जागतिक बाजारपेठेत प्रचंड चढउतार,  2024 मध्ये जागतिक मंदीची भीती, डॉलर निर्देशांकात कमजोरी,  जगभरातील केंद्रीय बँका सोने खरेदी करत आहेत, वाढत्या महागाईचा आधार सोन्याला मिळतो.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.