मेहरून तलाव परिसरात चौघांची एकाला मारहाण मोबाईल ,रोकड लुटली

0

जळगाव :- शहरातील मेहरून तलावावरील जॉगिंग ट्रॅकवर एकाच्या दुचाकीला ठोस मारून अपघात झाल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून तरुणाला मारहाण करून त्याच्याकडून मोबाईल घड्याळ आणि रोकड लुटून पसार झाल्याची घटना १५ रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तारीक अल्ताफ खाटीक वय 23 हा खाजगी नोकरी करीत असून मेहरून रोडवरील गुलाब बाबा कॉलनीमध्ये राहायला आहे तारीख हा 15 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मेहरून तलावाच्या जॉगिंग ट्रॅकवर आला असता तेथे एक पल्सर मोटरसायकलवर आलेल्या व्यक्तीने त्याच्या मोटरसायकलला ठोस मारून अपघात झाल्याच्या कारणावरून इतर दोन व्यक्ती आणि दुसरी मोटर सायकल क्रमांक एम एच १९- डी यु ४६ १० वर आलेला एक जण अशा चारही जणांनी तारीक याला लाथा बुक्क्यांनी चाप्टानी दगडाने मारहाण करून त्याच्या जवळील मोबाईल ब्लूटूथ हेडसेट सोनाटा कंपनीचे मनगटी घड्याळ व रोकडा असा 27 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज लुटून फवारा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.