कोल्हापूरसह ‘या’ शहरांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, वाचा सविस्तर

0

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोल्हापूरमध्ये आज ३.४ रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे. हे भूकंपाचे धक्के सकाळी ६. ४५ चा सुमारास जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्रस्थळ ५ किमी खोल असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली असल्याची माहिती समोर आलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ३.४ रिश्टल स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचा केंद्र बिंदू जमिनीपासून ५ किमी खाली होता.

कोल्हापूर पासून ७६ किमी अंतरावर चांदोली अभयारण्यात भूकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी ६ वाजेपासून ४५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह जवळच्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पहाटे भूकंपाचा धक्का जाणवल्याने सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

कोयना धरणापासून २० किलोमीटर अंतरावर हे भूकंपाचे धक्के जावळे होते पण, धरणाला कसल्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे समोर येत आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचे समोर येत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारासह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.