मराठी सिनेसृष्टीला येणार अच्छे दिन; शासनाने उचलले हे पाऊल…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मराठी सिनेसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मराठी सिनेसृष्टीला आणि मराठी सिने निर्मात्यांना येणाऱ्या काळात अच्छे दिन पाहायला मिळणार आहेत. मराठी सिने-दिग्दर्शक आणि निर्मांत्यांना आता बिनधास्त मराठी सिनेमे तयार करता येणार आहेत. पर्यटन व सांस्कृतिक विभाग फिल्म बाजार ही ऑनलाईन वेब साईट तयार करणार आहे. या फिल्म बाजार वेब साईटसाठी एका विशेष समितीची घोषणा करण्यात आली आहे. या समितीत अभिनेता स्वप्निल जोशी आणि ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारेंचीही निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिग्दर्शक संजय जाधव, निर्माते केतन मारू यांचाही समितीत समावेश आहे. तसंच  भाजप चित्रपट युनियनचे प्रमुख संदीप घुगेही समितीमध्ये असणार आहे.

त्याचप्रमाणे या वेब साईटच्या माध्यमातून राज्यात मराठी सिनेमा, मालिका आणि कार्यक्रम प्रदर्शित करताना मार्गदर्शन व मदतीसाठी ऑनलाईन पद्धतीने फिल्म बाजार पोर्टल विकसित केले जाणार आहेत. या वेब स्टाईसाठी शासनाने फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ही समिती राज्यात स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांवर चित्रपट निर्मिती करताना मार्गदर्शन करेल. तसेच आर्थिक नुकसान झाल्यास चित्रपट निर्मात्यांना भविष्यात सिनेमांची निर्मिती करण्यासाठी कमीत कमी दरात हमी मिळेल का? याबाबतही अभ्यास करणार आहे. शासनाच्या या नव्या उपक्रमामुळे आता मराठी सिनेमांना खरंच अच्छे दिन येणार का हे येणारा काळच ठरवणार आहे.

मराठी सिनेमांसाठी राज्य शासनानं घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे मराठी सिनेसृष्टी तसंच दिग्दर्शक, निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मराठीत सिनेमांची निर्मिती करताना कोणत्याही शंका, अडचणी आल्या तर राज्य शासनची ही वेब साईट त्वरित मदतीसाठी धावून येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.