आचार्य विद्यासागरजींच्या पदस्पर्शाने साकळी भूमी पावन!

विद्याताई महाजन यांचे प्रतिपादन : शारदा विद्या मंदिरात विनयांजली

0

मनवेल, ता.यावल  आचार्य मुनीश्री विद्यासागरजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने साकळी गावाची संपूर्ण भूमी पावन झालेली असून त्यांचे चरणस्पर्श गावात लाभणे हे गावाचे भाग्य आहे.

संतशिरोमणी, ब्रम्हांडनायक, राष्ट्रसंत,जैन मुनिश्री आचार्य 108 विद्यासागरजी महाराज यांनी डोंगरगड येथे देहाचा त्याग केला. दरम्यान शारदा विद्या मंदिर शाळेत मुनिश्री आचार्य विद्यासागरजी महाराज यांना विनयांजली अर्पण करण्यात आली.

मुनीश्रींच्या साकळी येथील सन 1996 च्या भेटीच्या आठवणींना संस्थेच्या अध्यक्षा विद्या वसंतराव महाजन यांनी विनयांजली समर्पित करतांना उजाळा दिला. तत्कालीन अध्यक्ष स्व.वसंत महाजन यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत 1996 ला धार्मिक कार्यक्रमानिमित्त आचार्य मुनिश्री विद्यासागरजी महाराज व तसेच इतर दिगंबर मुनीश्रीं यांच्या संत संघाने प्रवासादरम्यान साकळी येथे भेट दिली होती. भारत देश ही संतांची भूमी असून या भूमीत अनेक थोर संत होऊन गेले.त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण सर्वांनी मार्गक्रमण केले पाहिजे. मुनिश्री आचार्य विद्यासागरजी महाराज महान राष्ट्रसंत असल्याचे श्रीमती महाजन यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.