मनवेल येथे क्षयरोग आजारावर जनजागृती मोहीम

0

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क 

यावल तालुका आरोग्य विभागाकडून गणपती उत्सवनिमित्त क्षयरोग आजारावर जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. क्षयरोग हा आजार कसा बरा होतो व त्यावर काय उपचार केले पाहिजे या विषयावर मनवेल  येथील आशा स्वंयसेविका मार्फत  गणेश मित्र मंडळ मार्फत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धाच्या वेळी उपस्थित असलेल्या महिलांना आशा सेविका रंजना कोळी, पूनम पाटील यांनी क्षयरोग आजारा विषयावर जनजागृती बद्दल मार्गदर्शन केले.

क्षयरोग मुक्त अभियान अंतर्गत यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.  गफुर तडवी, साकळी येथील डॉ. स्वाती कवडीवाले, क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अस्मा प्रविण नमुउद्दीन शेख,  गटप्रवर्तक चित्रा जावळे, लीना पाटील यांचे क्षयरोग आजारावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

क्षयरोग आजार निदान पुर्ण केल्यावर बरा होतो या आजारावर आरोग्य विभागामार्फत औषध उपचार करण्यात येत असून शासनाकडुन अनुदान मिळते. रुग्णांनी कुठल्याही अफवेला बळी न पडता आरोग्य विभागाशी संपर्क साधून क्षयरोग आजाराबद्दल मनातील शंका काढावी असे मार्गदर्शन आशा स्वंयसेविका रंजना कोळी  यांनी मार्गदर्शन  केले.

यावेळी अंगणवाडी सेविका कल्पना पाटील, आशा स्वंयमसेविका, ज्योती मोरे सह गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते  उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.