मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एकाची २२ लाखांची फसवणूक

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील शिवकॉलनी येथे राहणाऱ्या प्रौढ व्यक्तीला त्याच्या मुलाला मंत्रालयात सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत खोटी आर्डर दाखवून एकुण २२ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविणचंद पांडूरंग दिघोळे हे जळगाव शहरातील शिवकॉलनीमध्ये राहतात. दिघोळे यांची धुळ्यात राहणाऱ्या चंद्रभान जवरीलाल ओसवाल व त्याचा लहान भाऊ अनिल जवरीलाल ओसवाल यांच्याशी मागील १५ वर्षापासून ओळख आहे. ओसवाल भावांनी दिघोळे यांना तुमच्या मुलाला मंत्रालयात मोठ्या पदावर नौकरी लावून देतो, आमची उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत ओळख आहे, अशी थाप मारली. मात्र, नोकरी मिळविण्यासाठी २२ लाख रुपये द्यावे लागतील. त्यानुसार वेळेवेळी दिघोळे यांच्याकडून पैसे स्वीकारले.

परंतू २ वर्ष होऊन देखील नौकरी लागत नसल्यामुळे दिघोळे हे वारंवार फोन करू लागे. सुरुवातीला ओसवाल यांनी उडवाउडवीचे उत्तर दिली. नंतर मात्र, त्याने मंत्रालय मुंबईच्या नावाने झेरॉक्स असलेली बनावट ऑर्डर दाखविली, पर्यवेक्षक पदावर निवड झाल्याचे सांगत त्याने मुंबईला जावू व जॉईनिंग करु असे सांगितले. पण मुंबई येथे जाऊनही जॉईनिंग न झाल्यामुळे दिघोळे यांनी ओसरवालकडे पैसे वापस करण्याची मागणी केली. परंतू पैसे परत मिळत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिघोळे यांनी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.