लोकखाद्य नागरी : माॅकटेल

0

लोकशाही विशेष लेख

कडक उन्हाळ्यात थंड सरबत, कोकम किंवा ऊसाच्या रसाची चव घेतली नाही तर तो उन्हाळा कसला. सरबतांचे अनेक प्रकार पहायला मिळतात. लिंबू, खस, आवळा, किंवा ताज्या फळांचे सरबत आपण रोजच पित असतो. आज आपण थोड्या वेगळ्या प्रकारात मोडणारी सरबतं रिफ्रेशमेंट म्हणून पाहणार आहोत, ते म्हणजे ‘माॅकटेल’, बाजारात यांची किंमत जास्त आहे तर आपण घरीच सोप्या आणि कमी खर्चात करुयात.

माॅकटेल हे एक अल्कोहोल आणि नाॅन-अल्कोहोलिक ड्रिंक आहे. १९८० पासून पाश्चात्य देशांमध्ये समारंभात किंवा पार्ट्यांमध्ये कोल्ड- ड्रिंक्सची जागा या माॅकटेलनी घेतली आणि आज भारतात देखील विविध माॅकटेल्स लग्न समारंभातील स्टाॅलवर दिसून येतात. महागड्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन हि आधुनिक सरबतांची चव चाखण्यापेक्षा घरीच बनवणे सोपे आहे.

१. वर्जीन मोयीतो

‘वर्जीन मोयीतो’ मूळात हा स्पॅनिश शब्द. इंग्रजी मध्ये लिहीताना Mojito असा लिहीला जाणारा शब्द मोयीतो असा बोलला जातो. पाहूयात साहित्य…

साहित्य :
पुदिन्याची पानं, लिंबू व लिंबाचा रस, सफरचंद, बर्फाचे तुकडे, बारीक साखर, सोडा बाॅटल, आवश्यक असल्यास मीठ

कृती :
एक ग्लास घेऊन त्यामध्ये पुदिन्याची पानं आणि लिंबूच्या दोन-तीन चकत्या, एक चमचा लिंबाचा रस, दोन चमचे साखर व चवीपुरते मीठ टाकून मडलरच्या (लाकडाचे खलबत्तासारखे असते) सहाय्याने एकजीव करून घ्यावे. ग्लासमध्ये तीन-चार बर्फाचे खडे टाकावे. एकजीव केलेल्या मिश्रणात एक ग्लास सोडावाॅटर आणि सफरचंदाचे एकदम बारीक केलेले तुकडे घालून चमच्याने ढवळून पिण्यासाठी द्या .

वाटरमेलन मोयीतो
साहित्य :
पुदिन्याची पानं, लिंबू व लिंबाचा रस, कलिंगड, बर्फाचे तुकडे, बारीक साखर, सोडा बाॅटल, Sprite आवश्यक असल्यास मीठ

कृती :
एक ग्लास घेऊन त्यामध्ये पुदिन्याची पानं, कलिंगडाचे काप, लिंबूच्या दोन-तीन चकत्या, एक चमचा लिंबाचा रस, दोन चमचे साखर व चवीपुरते मीठ टाकून मडलरच्या सहाय्याने एकजीव करून घ्यावे. ग्लासमध्ये तीन-चार बर्फाचे खडे टाकावे. एकजीव केलेल्या मिश्रणात अर्धा ग्लास सोडावाॅटर आणि Sprite softdrink घालून चमच्याने ढवळून झटपट पिण्यासाठी द्यावे. कलिंगडाचे बारीक काप करून त्यामध्ये मिक्स करून ढवळून पिण्यासाठी द्यावे.

विविध फळांपासून आपण वेगवेगळे मोयीतो माॅकटेल्स बनवू शकतो. जसे की, ओरेंज मोयीतो, किवी मोयीतो, ब्लॅकबेरी मोयीतो, ब्लॅक करंट मोयीतो, पायनॅपल मोयीतो, मँगो मोयीतो, स्ट्रॉबेरी मोयीतो इ……

 

अपर्णा स्वप्निल कांबळे/नांगरे.
९८९२१३८१३२
पत्रकार/फूड ब्लॉगर

Leave A Reply

Your email address will not be published.