पुण्यात आईनेच केली मुलीची चाकू भोसकून हत्या !

0

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यात हडपसरपरिसरात आपल्या पोटच्या मुलीचा चाकू भोसकून क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथे घडली आहे. वैष्णवी महेश वाढेर असं ४ वर्षीय मृत मुलीचं नाव आहे. या संपूर्ण प्रकरणात मयत वैष्णवीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने हत्या कोणत्या कारणाने केली हे अद्याप समजू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री हडपसरच्या सिद्धिविनायक दुर्वांकुर सोसायटीत ससाणे नगर येथे एका चिमुकलीचा निर्घृण खून झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनीं दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला कल्पी आपल्या मुली वैष्णवी सोबत सिद्धिविनायक दुर्वांकुर या सोसायटीत एकटीच राहत होती. बेकरीचे प्रॉडक्ट विकून ती आपला उदरनिर्वाह करायची.

 

सोमवारी तिला घरमालकाने घर रिकामे करायला सांगितले होते. सोमवारी ती राहते घर सोडणार होती. त्यासाठी घरमालक तिच्या घरी गेले असता त्यांनी वारंवार दार ठोठावून देखील आतून दार बंद होते आणि काही प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने दार जोरात ढकलले तेव्हा आत चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळविले पोलिसांनी आरोपी आईवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून आईला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.