पत्ते खेळणाऱ्या अतिक्रमण विभागातील चार कर्मचाऱ्यांना नोटीस

0

जळगाव : – महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्तव्यावर असलेले चार कर्मचारी ऑन ड्यूटी जुगार खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी चौकशीचे आदेश दिले असून या प्रकरणी मनपा उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी त्या चार कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलास मागविला आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचारी सतीश ठाकरे, नितीन भालेराव, संजू पाटील, नाना कोळी हे चार कर्मचारी एका खोलीत बसून जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कर्मचारी जुगार खेळत असल्याने खळबळ उडाली असून महापालिकेची प्रतिमा मलीन झाली आहे. सदर घटनेची दखल घेत मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेचे उपायुक्त अविनाश गांगुर्डे यांनी त्या चौघा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्याकडून लेखी खुलासा मागविला आहे. अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर पुढील कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.