रजनीकांतच्या ‘जेलर’ सिनेमाने २ दिवसात केली तब्बल ‘इतकी’ कमाई

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

दाक्षिणात्य सुपरस्टार ‘रजनीकांत'(Rajinikanth) चा मोठा खूप मोठा चाहतावर्ग असून, आजही चाहत्यांनमध्ये त्यांच्या सनेमाची क्रेझ सुद्धा तेवढीच आहे. सध्या त्याचा ‘जेलर’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या दोन दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे.

‘जेलर’च बॉक्स ऑफिस कलेक्शन
मीडिया रिपोर्टनुसार, जेलर या सिनेमाचे रिलीजच्या पहिल्या दिवशी ४८ कोटींची कामे केली आहे. तर दुसऱ्या दिवशी २७ कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने ७५.३५ कोटींचा गल्ला जमवला आहे. विकेंडला सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

२०० कोटींच्या बजेटमध्ये ‘जेलर’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात रजनीकांतसह शिव राजकुमार, मिर्ना मेनन, तमन्ना भाटिया, (Tamannaah Bhatia) मोहनलाल आणि वसंत रवी हे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. या सिनेमातील गाणी पेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. रिलीजच्या दोन दिवसात या सिनेमाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे.

रजनीकांतच्या चित्रपटाने रचला इतिहास

१) ‘जेलर’ सिनेमा तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट

२) ‘जेलर’ने केरळमध्येही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला

३) आंध्र प्रदेशात २०२३ मधील सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा

‘जेलर’ सिनेमाची क्रेझ इतकी जास्त आहे की, सिनेमाच्या रिलीजच्या दिवशी बंगळूरू आणि चेन्नईसह अनेक ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. एवढेच नाही तर, एक जपानी जोडपे ओसारावरुन चेन्नईला खास चित्रपट वाहायला आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.