नाशिकात अजून एक अग्नितांडव; गॅस सिलेंडरच्या ट्रकला आग (व्हिडीओ)

0

 

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क:

नाशिक साठी आजचा दिवस आगीच्या घटनांचा ठरला आहे. सकाळी खासगी ट्रॅव्हल्स बसला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता मनमाडजवळ पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलेंडर घेऊन ट्रकला अपघात झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. एकापाठोपाठ स्फोटानंतर सिलेंडर हवेत उडतांना दिसले.

गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना मनमाडपासून जवळ पुणे-इंदौर महामार्गांवर घडली. आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे यामार्गांवरील वाहतूक 2 किमी लांब रोखून धरण्यात आली आहे. ट्रकमध्ये गॅसने भरलेले सुमारे 200 सिलेंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर एकापाठोपाठ काही सिलेंडर आकाशामध्ये उडाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे इथं जाण्यास अडचण येत आहे. अपघातात चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.