Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»बुरखा घालून प्रेयसीला भेटला अन् नागरिकांनी चोपला.. Video
    उत्तर महाराष्ट्र

    बुरखा घालून प्रेयसीला भेटला अन् नागरिकांनी चोपला.. Video

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 25, 2022Updated:September 25, 2022No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    सध्या गेल्या काही दिवसापासून मुले पळवणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातारण निर्माण झालेय. सांगली, पालघरमध्ये तर साधूंना मुले पळवणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आली होती.

    *बुरखा घालून प्रेयसीला भेटला अन् नागरिकांनी चोपला..

    *सविस्तर वाचा*👇https://t.co/cep35wV3Jk
    ~~~~~~~~~~~~~~~~#Nashik #ViralVedio pic.twitter.com/zcp1Kjk5Xb

    — LOKSHAHI (@elokshahi) September 25, 2022

    सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडीओमध्ये एक महिला बुरखा घालून मुलांना पळवून नेत आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ही अफवा असली तरी याचा मोठा फटका एका प्रियकराला बसला आहे. नाशकमध्ये एका प्रियकराला मुले पळविणारा समजून स्थानिक नागरिकांनी त्याला बेदम बदडल्याची घटना घडली आहे.

    मुलं पळविणारा असल्याचं समजून एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना नाशिकच्या वडाला गाव येथे घडली. एक प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला आणि स्थानिकांनी त्याला मुलं पळविणारा समजून बेदम मारहाण केली आहे. कारण हा प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क बुरखा परिधान करुन आला होता त्यामुळे हा व्यक्ती मुलं पळविणारा असल्याचा संशय स्थानिक नागरिकांना आला. त्यात सोशल मीडियावरील अफवेमुळे त्यांचा हा गैरसमज अधिकच वाढला आणि त्यांनी प्रियकराला चोर समजून बेदम मारहाण केली.

    यावेळी मोठी गर्दी जमली होती. सुदैवाने येथून पोलिसांची गाडी जात होती. जमलेली गर्दी पाहताच पोलिसांची याठिकाणी हस्तक्षेप केला आणि त्या जमावातून प्रियकराला बाहेर काढले. या प्रियकराची चौकशी केल्यानंतर हा संशयित आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला असल्याची माहिती उघड झाली.

    crime news man wears burqa Nashik Viral Vedio
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif