यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क;
यावल ते भुसावळ रस्त्यावरील शेताच्या बांधावर विजेचा धक्का लागल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. दरम्यान हा अपघात नसून घात झाल्याची शक्यता असू शकते असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
येथील भुसावळ मार्गा वरील रस्त्यावरील एका शेतातील बांधावर चौतीस वर्षीय व्यक्ति मरण पावलेल्या अवस्थेत मिळुन आला आहे. याबाबतची अधिक माहिती पोलीसांकडून मिळाली असता सदरच्या मयत व्यक्तीचे नाव विशाल रमेश मेढे (३४), रा. अडावद तालुका चोपडा याचा असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या व्यक्तिचा मृतदेह यावल भुसावळ मार्गावरील रस्त्यावर टेलीफोन एक्सचेंज च्या कार्यालया समोरील परिसरातील गट क्रमांक ७२४/२ या शेताच्या बांधावर आढळून आला आहे. सदर इसम हा शॉक लागल्याने जागीच मरण पावल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरिक्षक राजेन्द्र साळुंके यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. परिसरात घटनेची माहिती मिळताच लोकांनी धाव घेत मृतदेह ग्रामीण रूग्णालयात पाठविला. या संदर्भात सचीन कोळी रा. यावल यांच्या फिर्यादी वरुन पोलिसात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.