मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या ५६ थकबाकीदारांच्या मालमत्तांचा होणार लिलाव

0

जळगाव;- मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या ५६ थकबाकीदारांच्या मालमत्ताचा लिलाव करण्यात येणार असून त्यांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी उताऱ्यानुसार बांधीव व खुले क्षेत्र किती याचे मोजमाप करण्यात येणार आहे. त्यानंतर नगररचना विभागाकडून संबधित मालमत्तांचे मुल्यांकन केले जाणार असून मूल्यांकन निश्चित झाल्यानंतर लिलावाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.

यामालमत्ताधारकांकडे १ कोटी ४५ लाखाची थकबाकी आहे. थकबाकीदारांसाठी महापालिकेने अभय शास्ती योजना राबविली. या योजनेला वारंवार मुदतवाढही देण्यात आली. थकबाकीदारांनी कराचा भरणा करावा व पुढील कारवाई टळावी हा त्यामागचा हेतू आहे, मात्र तरी देखील अनेक जणांना भरणाच केला नाही. ४०० पेक्षा जास्त जणांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेऊन त्यांना जप्तीचे बंधपत्र बजावण्यात आले. त्यानंतर काही जणांनी कराचा भरणा केला. अंतिम क्षणापर्यंत ५६ जण थकबाकीदार राहिले असून त्यांच्या मालमत्तांचा आता लिलाव करणे हाच पर्याय उरला आहे. या ५६ थकबाकीदारांच्या मालमत्तांचे उतारे मुल्यांकनासाठी नगररचना विभागात पाठविण्यात आले होते,

मात्र त्यात त्रुटी काढण्यात आल्या. प्रत्येक मालमत्तेचे बांधीव व खुले क्षेत्र किती याचे वर्गीकरण करुन द्यावे, त्यानंतरच मुल्यांकन करता येईल, असे सांगून नगररचना विभागाने या सर्व फाईल महसूल विभागाकडे परतपाठविल्या असता प्रत्येक मालमत्तांचे यातील बहुतांश घराचे मालक बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले आहे.

नियमित वसुलीसाठी महापालिकेने १५ पथके नियुक्त केली आहे, या पथकांनी नियमित थकबाकीदार असलेल्या पाचशे पेक्षा जास्त घरांचे नळ कनेक्शन बंद केले आहे. आतापर्यंत ९८ कोटी रुपयांचा कर वसुल झाला आहे. दरम्यान, वसुली पथकातील दांडी बहाद्दारांचा कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो आयुक्तांकडे सादर करण्यात आलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.