तैलिक महासभा महिला आघाडी स्नेहमिलन कार्यक्रम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मलकापूर :-जागतिक महिला दिनानिमीत्त महाराष्ट्र तैलिक महासभा महिला आघाडीच्यावतीने सखी-सहेली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथील संताजी भवनमध्ये १२ मार्च शनिवार रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुमनताई आकोटकर तर प्रमुख उपस्थितांमध्ये महिला आघाडी राज्य उपाध्यक्षा अनिता शंखपाळ, जिल्हाध्यक्षा सुलोचना सुलताने, कार्याध्यक्ष  विमलताई चोपडे, विभागीय सचिव राजेश आकोटकर, विभागीय सदस्य मिलिंद डवले आदी उपस्थित होते.

संताजी महाराजाच्या प्रतीमा पुजनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डाॅ. तेजल काळे यांनी आरोग्य आणि शारीरिक सुदृढता राखण्यासाठी प्रसन्न आणि आनंदी राहण्याचे अनेक उपाय सुचविले. कार्यक्रमा दरम्यान विविध रंजक, मनोरंजक आणि सुसंवाद साधून सामाजिक ऐक्य निर्माण करणारे उपक्रम सादर करण्यात आले. तर शारदा गलवाडे यांना सामाजिक कायद्यातील योगदानासाठी घे भरारी हा पुरस्कार तसेच अपर्णा भिसे यांना ध्येयपुर्ती या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा गलवाडे यांनी तर प्रास्ताविक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा.स्वाती लोखंडे यांनी केले. तसेच प्रमिला जामोदे यांनी स्वागत गित गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या स्नेहमिलन कार्यक्रमासाठी संपुर्ण जिल्हाभरातून तैलिक महिला आघाडी सदस्य व युवतींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहीली

Leave A Reply

Your email address will not be published.