मलकापुरात युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांचा सत्कार संपन्न.

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मलकापूर :- तालुका युवक काँग्रेस व शहर युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक 12 मार्च रोजी दुपारी 2:00 वाजता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष  सत्यजित दादा तांबे यांनी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.राजेश एकडे साहेब यांच्या मलकापूर येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये सदिच्छा भेट दिल्यानंतर युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचा मलकापुर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अँड.दिलीप बगाडे  यांनी पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला

त्याप्रसंगी त्यांच्यासोबत आलेले प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस विजयसिंग राजपूत, नवनिर्वाचित प्रदेशचे महासचिव मनोज कायंदे, नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी, नवनिर्वाचित प्रदेश सचिव सोनु कुळे, जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी मलकापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजु पाटील यांनी सुद्धा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या कार्यक्रमात बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ता संभाजी शिर्के,  रईसखा जमादार ,शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तुषार साबळे ,जमीलखा जमादार ,निलेश बोरसे, अतुल खोडके, समाधान इंगळे सर, विनोद बिराडे, संदीप चोरे ,मोहिन सर, सुरज धांडे, विनोद वाघमारे, उखर्डा तांदूळकर, संतोष भोंबे, प्रवीण दाते ,अखमल मोहम्मद, दिपक जाधव, सौरभ चव्हाण ,गणेश चिखलकर, पवन रायपुरे यांचेसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.