हुतात्मा विर जगदेवराव सूतगिरणीला पुनर वैभव प्राप्तीचे संकेत

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मलकापूर:-मलकापूर मतदार संघातल्या हजारो भागधारक शेतकऱ्यांसाठी  त्याच बरोबर शेकडो कामगारांसाठी महत्त्वाचा विषय असलेल्या वीर जगदेवराव सूतगिरणी च्या बद्दल विधिमंडळाच्या  अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. आणि त्यानिमित्ताने शासनाच्या निधीच्या माध्यमातून वीर जगदेवराव सूतगिरणीला पुनर वैभव प्राप्त होण्याचे संकेत मिळत आहेत.

आणि मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.एकडे यांनी अर्थसंकल्पीय_ २०२२ अधिवेशनात उचललेला प्रश्न मुळे मलकापूर मतदार संघात त्यांचे कौतुक होत आहे . एकेकाळी मलकापूर मतदार संघाचे वैभव असलेल्या हुतात्मा विर जगदेवराव सहकारी सूतगिरणी ही घाटा खालील तीन तालुक्या तील  मलकापूर, नांदुरा,मोताळा तालुक्यातील भागधारक शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव देणारी संस्था होती.

त्याच बरोबर शेकडो कामगारांचा उदार निर्वाह कामाच्या माध्यमातून होत होता मात्र गेली दोन दशकं या सूत गिरणी वर नको त्या मंडळींचं वर्चस्व असल्यामुळे वैयक्तिक स्वार्थ वगळता कुठलेही सामाजिक विकास कामे झाल्याचे दिसून आले नाही त्यामुळे आज  वीर जगदेवराव सूतगिरणीची भंगार अवस्था झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण मतदारसंघांमध्ये सूतगिरणी पुन्हा एकदा उभी राहावी कोट्यावधीची शेतकऱ्यांची मालमत्ता पुन्हा उभी राहावी अशी अपेक्षा जन माणसांमध्ये होती.

त्याच धरतीवर आज २१ मार्च २०२२ रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनात आ.राजेश एकडे यांनी मलकापूर मतदार संघातील जनतेची निकट लक्षात घेत वीर जगदेवराव सूतगिरणीच्या मध्यवर्ती वर प्रश्न उपस्थित करून या संस्थेला पुनर उभारणी करता पुन्हा निधी द्यावा अशी आग्रही मागणी केली आणि त्यांच्या या मागणीला लवकरच यश प्राप्त होईल असे संकेत मिळाले असुन या निमित्ताने का होईना सूतगिरणीला पुनर वैभव प्राप्त होण्याचे दिसत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.