एसटी बस आणि दुचाकीमध्ये अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

0

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय महामार्गावर धानोरा (विटाळी) नजीक एसटी बस व मोटरसायकलचा अपघात सकाळी ११:०० वाजता झाला. यामध्ये मोटर सायकल वरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले.

राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून धानोरा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नाही त्यामुळे सदर दुचाकीस्वारांना अपघातास सामोरे जावे लागल्याची चर्चा आहे.

चांदूर बीस्वा येथील तरुण अर्पित डोके (वय २०) व फरदीन खान (वय १८) हे मोटरसायकल क्रमांक MH 05 AV 4205 ने सकाळी अकराच्या सुमारास चांदूरबिस्वा येथून धानोरा येथे येत असताना राष्ट्रीय महामार्गावर उड्डानपुलाजवळ त्यांच्या दुचाकीस एसटी बस क्रमांक MH 11 BL 9228 ने धडक दिली.

धडकेत दुचाकीवर असलेले दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. जखमींना मंगेश भाकरे, ज्ञानेश्वर वेरुळकर व इतरांनी मदत करत तात्काळ त्याच एसटी बसने उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे नेण्यात आले आहे. परंतु जखमी पैकी फरदीन खान याची तब्येत गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.